सावंतवाडी ता.१५-: गेले आठ दिवस उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी येथील महिला वॉर्ड मध्ये 20 फूट उंचीवर अडकून पडलेल्या ससाणा जातीच्या पक्षाला अथक प्रयत्न करून निखिल जाधव व सामाजिक बांधिलकी चे रवी जाधव या पशु प्रेमीनी जीवदान दिले आहे.
निखिल जाधव या मुलाने 20 ते 25 फूट वर चडून खिडकीची जाळी फाडून त्या पक्षाला बाहेर जाण्याचा मार्ग मोकळा करून दिला असता, आठ दिवसानंतर त्या पक्षाने आनंदाने आकाशात भरारी घेतली. तेव्हा उपस्थितांनी सुटकेचा श्वास घेतला. यावेळी वनखात्याचे प्रमोद सावंत, प्रमोद राणे, तुषार सावंत, राजू धारपवार व हॉस्पिटल स्टाफ उपस्थित होते.
