यात्रेपूर्वी अपूर्ण विकासकामे पूर्ण करा…

उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या सबंधित विभागानाआढावा बैठकित सूचना

देवगड ता.१५-:* श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रौत्सव दि१ मार्च महाशिवरात्री या दिवशी होणार असून कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असले तरी शासन,प्रशासन यांच्या कोरोना निर्बंधांचे पालन करून ,साजरा करण्यात येणार आहे. यात प्रशासकीय यंत्रणेचा सहभाग हा महत्वाचा असतो.त्या अनुषंगाने कुणकेश्वर परिसरातील अपूर्णावस्थेत असलेली विकास कामांची पूर्तता,तसेच विविध सोयी सुविधा या यात्रौत्सवापूर्वी पूर्ण करण्याकरिता खातेप्रमुखाना प्रयत्न करावे. तसेच अपुरी विकास कामे मार्गी लावण्याकरिता प्रयत्न केले जातील .अशी माहिती उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी कुणकेश्वर यात्रा नियोजन पूर्व बैठकीत संबंधित विभागांच्या आढावा बैठकीत दिली.

दक्षिण कोकणची काशी समजल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र कुणकेश्वर यात्रा १ व २ मार्च रोजी संपन्न होणार असून शासन स्तरावर कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असल्याने या वर्षी कोरोनाचे प्रतिबंधात्मक उपाय योजना करून पार पाडण्यात यावी त्यानिमित्ताने खास विविध खात्यांची आढावा बैठक श्री क्षेत्र कुणकेश्वर सभागृहात उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

यावेळी परिक्षाविधींन कालावधीतील उपजिल्हाधिकारी तथा गटविकास अधिकारी (आयएएस)संजीता महापात्र,तहसीलदार मारुती कांबळे,पोलीस निरीक्षक,नीलकंठ बगळे,सा. बा.उपविभागीय अधिकारी श्रीनिवास बासुतकर,श्री महाले,तालुका आरोग्य अधिकारी रवींद्र राठोड,श्री कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लब्दे,सरपंच चंद्रकांत घाडी,ट्रस्ट उपाध्यक्ष दिनेश धुवाळी,सचीव शरद वाळके,खजिनदार अभय पेडणेकर,सदस्य संजय आचरेकर,संतोष लाड,विजय वाळके,अजय नाणेरकर,प्रकाश वाळके,मंगेश पेडणेकर,अनिल धुरी,दीपक घाडी,रुपेंद्र धुवाळी, पदसिद्ध सदस्य श्रीकृष्ण बोडाळे उपस्थित होते. व्यवस्थापक रामदास तेजम, ग्रामसेवक आदित्य कदम उपस्थित होते. : या बैठकीत प्रामुख्याने मुख्यमंत्री ग्रामसडक रस्ता,तसेच व्हीआयपी मार्ग,रस्त्यातील वाढलेली झाडी,तसेच बीएसएनएल रेंज,भरारी पथक,आपत्ती व्यवस्थापन,तसेच दर्शन रांगा, पाणीपुरवठा,पोलीस बंदोबस्त ,आरोग्य यंत्रणा,स्वछता ग्रामपंचायत नियोजन अन्य विविध खात्यांचा आढावा घेण्यात येऊन, अपुरी विकास कामे पूर्ण करण्याच्या सूचना संबंधित विभागांना उपविभागीय अधिकारी यांनी दिल्या.

You cannot copy content of this page