वेंगुर्ला प्रतिनिधी– वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसचे संस्थापक, माजी अध्यक्ष तथा विद्यमान सचिव सचिन परुळकर यांचे सामाजिक व इतर क्षेत्रात बहुमोल अस योगदान आहे. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत पीसीपीएनडीटीच्या (गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदानतंत्र) जिल्हा सल्लागार समिती सदस्यपदी निवड करण्यात आली.
नऊ सदस्य असणा-या समितीवर श्री.परुळकर यांची निवड झाल्याने जिल्हा सल्लागार समिती अध्यक्ष अॅड.अमोल सावंत व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील यांची त्यांचे अभिनंदन केले.
