वेताळ प्रतिष्ठानतर्फे यशवंत गडाची स्वच्छता

वेंगुर्ला ता.१५-:* शिवकालीन ऐतिहासिक वारसा संवर्धनाची भावना आणि सामाजिक बांधिलकी जपत वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने स्वच्छता व श्रमदान उपक्रम अंतर्गत रेडी येथील ऐतिहासिक यशवंत गडाची श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली. यशवंत गड येथे नेहमी पर्यटकांची ये-जा असल्याने प्पर्यटनाच्या दृष्टीने या स्थळाची सुस्थिती अबाधित राहणे आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन करीता हा उपक्रम राबविण्यात आला.

गड सुसज्ज राहण्यासाठी स्थानिक शिवप्रमी सातत्याने संवर्धनाकरिता प्रयत्नशील असून त्यामध्ये प्रतिष्ठान दरवर्षी आपला सहभाग दर्शवत असते. या स्वच्छता मोहिमेत वेताळ प्रतिष्ठानच्या ५० हुन अधिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेत गड परिसर स्वच्छ केला.

You cannot copy content of this page