6 महिन्याचे मानधन छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर व सुशोभीकरणासाठी देणार
कणकवली ता.१५-:* कणकवली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या सुशोभीकरण व स्थलांतराला करिता शहराचा प्रथम नागरिक म्हणून कणकवली शहरातील सर्व्हिस रोडवर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थलांतरण व सुशोभीकरणासाठी सहा महिन्याचे नगराध्यक्षपदाचे मानधन सुमारे 90 हजार रुपयांची रक्कम छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्र मंडळ यांना देत असल्याची घोषणा कणकवली नगरपंचायत नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केली.
कणकवली नगराध्यक्ष दालनात आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे,अभिजित मुसळे,महेश सावंत,विराज भोसले,बाबू गायकवाड आदी उपस्थित होते. समीर नलावडे म्हणाले,कणकवलीचा नगराध्यक्ष म्हणून माझी सामाजिक बांधिलकी जबाबदारी आहे.कोव्हीड कालावधीत एक वर्षाचे मानधन १ लाख ८० हजार रुपये गोरगरिबांना व कमळ थाळीसाठी दिले होते.आता ६ महिन्याचे मानधन ९० हजार रुपये छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्थलांतर व सुशोभीकरणासाठी देत आहे.१९ फेब्रुवारीला शिवाजी महाराज जयंती आहे,तो पुतळा स्थलांतर व सुशोभीकरणासाठी माझे ६ महिन्याचे मानधन ९० हजार रुपये देत आहे.
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक मित्रमंडळ आहे,या मंडळाकडे ९० हजार देणार आहे.नगराध्यक्ष म्हणून हातभार लागावा, यासाठी हे मानधन देत आहे, असे समीर नलावडे यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी ५०० स्क्वेअर फुटचा प्रस्ताव नगरपंचायतने जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवला आहे.पालकमंत्री उदय सामंत यांनी आता तातडीने निर्णय घेतला पाहिजे.पुतळा स्थलांतर प्रस्ताव गेला आहे,मोजणी झाली आहे.माझी जबाबदारी होती,त्याबाबत आमची पूर्तता आहे,असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.
कणकवली नगरपंचायतकडून पुतळा स्थलांतरना करिता जागेचा ठराव व त्या अनुषंगाने बाबी जिल्हाधिकाऱ्यांकडे सोपवल्या आहेत. पालकमंत्री व आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पुतळा स्थलांतरण या संदर्भात पाठपुरावा सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आलेले असताना पालकमंत्र्यांकडून या 18 गुंठे जागेची मोजणी देखील करून घेण्यात आली. त्यामुळे कणकवली शहराचा प्रथम नागरिक म्हणून मी या कामाकरिता माझा हातभार लागावा म्हणून हा निर्णय घेतल्याचे श्री नलावडे यांनी सांगितले.
