जिल्हाध्यक्ष राजन तेली यांची माहिती…
दोडामार्ग ता.१५सुमित दळवी-:* कसई दोडामार्गमध्ये भाजपाची कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दुरध्वनी द्वारे दिली.आता तालुक्याची जबाबदारी प्रमोद कामत व महेश सारंग याच्यावर देण्यात आली आहे.
दोडामार्गात गटातटाचे राजकारण चालते त्यामुळे याचा फटका जिल्हा बँक निवडणूक पासून ते नगरपंचायत निवडणुक पर्यंत बसला आहे.काही लोक पक्षशिस्त न मानता काम करत आहे.भाजपात पक्ष शिस्त महत्त्वाची असून ती मोडली गेल्यास कारवाई होते. यामुळे ही कारवाई केल्याचे जिल्हाध्यक्ष राजन तेली म्हणाले. काल भाजपाचे चेतन चव्हाण हे कसई दोडामार्ग नगरपंचयातचे नगराध्यक्ष झाले व आज कार्यकारिणी बरखास्त झाल्याने नेमके काय चुकले? ,याचे उत्तर भाजपा पदाधिकारी यांना शोधावे लागेल. मात्र भाजपाची सत्ता येऊनही कार्यकारिणी बरखास्त केल्याने तालुक्यात याची जोरदार चर्चा आहे.
