मनसे शिष्टमंडळाची निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी
ओरोस ता.१५-:* कोरोना मुळे बंद असलेले सेतू सुविधा केंद्र पूर्ण क्षमतेने पूर्ववत चालू करावे अशी मागणी मनसे शिष्टमंडळाने आज निवासी उप जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन केली आहे.
कोरोना काळात शासनाच्या निर्णयानुसार सेतू सुविधा केंद्र बंद करण्यात आले होते. त्यानंतर निर्बंध शिथिल केल्यावर पुन्हा एकदा सेतू केंद्र अशंतः सुरू करण्यात आले होते. परंतु, त्याचा फटका जिह्यातील जनतेला बसत असून, विविध दाखले मिळवण्यासाठी येत असलेल्या नागरिकांना सेतू केंद्र अंशतः सुरू असल्याने फटका बसत असून, त्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
