डॉ. राहुल वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला शुभारंभ…
मालवण दि प्रतिनिधी मालवण शहरातील चिवला बिच मार्गावर वालावलकर उद्यान येथून पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मालवण नगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या आरसीसी चेंबर व क्रॉसिंग बांधकाम कामाचा शुभारंभ मालवणचे डॉ. राहुल वालावलकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी बांधकाम सभापती यतीन खोत,रुजाय फर्नाडिस, प्रसन्ना मयेकर, विलास मयेकर, दीपा शिंदे, कोचरेकर, शांती तोंडवळकर, साक्षी मयेकर, व इतर उपस्थित होते यावेळी मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर आणि यतीन खोत यांचा चिवला बीच येथील नागरिकानी सत्कार केला
