राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत नील बांदेकर प्रथम

सावंतवाडी ता.१४-:मुद्रिका शिंदे संचलित राज्यस्तरीय वेशभूषा स्पर्धेत केंद्रशाळा बांदा नंबर 1 मध्ये इयत्ता तिसरी शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने तिसरी ते चौथी या गटांमध्ये राज्यातून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला. राष्ट्रीय नेत्यांची वेशभूषा या विषयावर आधारित वेशभूषा स्पर्धेत नीलने लोकमान्य टिळक यांची वेशभूषा लीलया साकारली.

यापूर्वीही नीलने चित्रकला, वक्तृत्व, कथाकथन, मॉडेलिंग, हस्ताक्षर, यासारख्या अनेक स्पर्धा मध्ये राज्यात प्रथम क्रमांक पटकावला होता. त्याच्या यशात बांदा केंद्र शाळेतील समस्त शिक्षक वृंद, मुख्याध्यापिका सरोज नाईक, उपक्रमशील शिक्षक जे. डी पाटील सर आणि वर्गशिक्षिका प्राजक्ता पाटील यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले. नील च्या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, सरपंच अक्रम खान व बांदा ग्रामस्थांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

You cannot copy content of this page