मराठी भाषा संवर्धन विषयावर सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे आयोजन

कणकवली तालुका पत्रकार समितीचा उपक्रम

कणकवली 14 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावीतीने व पत्रकार आणि मित्राच्या सहकार्याने मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा संवर्धन या विषयावर सुंदर हस्ताक्षर लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे . सदरची स्पर्धा पाचवी ते आठवी व • नववी ते बारावी अशा दोन गटांत होणार असून प्रत्येक गटासाठी अनुक्रमे २५०० रु .१५०० रु . व १ हजार अशी पारितोषीके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . तालुका पत्रकार समितीच्यावतीने व पत्रकार आणि मित्रच्या सहकार्याच्या माध्यमातून आयोजित या स्पर्धेत ज्या शाळां , कॉलेजमधील विद्यार्थी सहभागी होऊ इच्छितात त्यांनी १०० ते १५० शब्दांमध्ये मराठी भाषा संवर्धन या विषयावर स्वहस्तलिखीत पाठवावयाचे आहे . सदरचे हस्तलिखीत वर्गशिक्षकांमार्फत मुख्याध्यापक , प्राचार्य यांच्या सही शिक्क्यानिशी पत्रकार समिती सदस्य किंवा अशोक एजन्सी कणकवली व मनिष ऑनलाईन कणकवली येथे २२ फेब्रुवारी २०२२ रोजी दु . २ वा . पर्यंत पोहोचेल असे पाठवावे तालुका पत्रकार समितीच्यावतीने दि . २७ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या पुरस्कार वितरण कार्यक्रमात यातील विजेत्यांना पारितोषीके देऊन गौरविण्यात येणार आहे . तसेच यात सहभागी झालेल्या स्पर्धकांनाही सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे . तरी जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धकांनी यात सहभागी व्हावे , असे आवाहन पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई , सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम व पत्रकार आणि मित्रचे संस्थापक अध्यक्ष रजनिश राणे यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी ९४०५७७६८६८ व ९ ४२२४३६३०८ या नंबरवर संपर्क साधावा .

You cannot copy content of this page