दशावतार प्रश्नमंजुषा मध्ये राजेश आकेरकर प्रथम

वेंगुर्ले ता.१४-:* वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग तुळसच्या वतीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले जाते.दशावतार कलेला प्रोत्साहन देण्यासाठी दशावतार नाट्य महोत्सवाचे यशस्वी आयोजन गेली दोन वर्षे प्रतिष्ठान करीत आहे. दशावतार कलेचा इतिहास, या कलेची प्रचार प्रसिद्धी व्हावी, तसेच नवीन पिढीला दशावतराविषयी माहिती मिळावी या उद्देशाने प्रतिष्ठानकडून दशावतार विषयी ‘ऑनलाइन’ प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं.सदर स्पर्धेमध्ये ५१८ स्पर्धकांनी सहभाग दर्शवला.

या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये *राजेश रमाकांत आकेरकर (आंदुर्ले) यांनी प्रथम क्रमांक* पटकावला तर *रामचंद्र हरिश्‍चंद्र गावडे (असोली) यांनी द्वितीय क्रमांक* व *अँड चैतन्य विलास दळवी(वेंगुर्ला) यांनी तृतीय क्रमांक* मिळवत यश संपादन केले.

सदर प्रश्नावली तयार करण्यासाठी दशावतार अभ्यासक प्रा.वैभव खानोलकर यांनी तर प्रश्नावली गुगल फॉर्म मध्ये करून देण्यासाठी अदिती विवेक चव्हाण यांनी यांचे सहकार्य मिळाले.सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले,तर विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणापत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.दशावतार विषयी आगळी-वेगळी प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित केल्याबद्दल दशावतार प्रेमींनी प्रतिष्ठान चे आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page