देवगड जामसंडे नगराध्यक्षपदी सेनेच्या साक्षी प्रभू यांची निवड…

उपनगराध्यक्ष पदी मिताली सावंत विराजमान…

देवगड-प्रतिनिधी देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या साक्षी प्रभू यांनी भाजपाच्या प्रणाली माने यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव करुन नगराध्यक्षपदी साक्षी प्रभू या विराजमान झाल्या आहेत. तर उपनगराध्यक्षपदाच्या निवडीमधील महाविकास आघाडीच्या मिताली सावंत यांनी भाजपाच्या अरुणा पाटकर यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव करुन उपनगराध्यक्ष पदी मिताली सावंत या विराजमान झाल्या आहेत. देवगड-जामसंडे नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवडणुक पिठासन अधिकारी उपेंद्र तांबोरे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडली. नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेच्यावतीने साक्षी प्रभु तर भाजपाच्यावतीने प्रणाली माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र नगरपंचायतीमध्ये शिवसेनेचे 8 व राष्ट्रवादीचे 1 उमेदवार अशी महाविकास आघाडी असल्यामुळे शिवसेना राष्ट्रवादीला पुर्ण बहुमत होते. यामुळे नगराध्यक्षपदाच्या निवडणुकिमध्ये प्रभु यांनी 9 विरुध्द 8 मतांनी माने यांचा पराभव केला तर उपनगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी महाविकास आघाडीच्या मिताली सावंत यांनी भाजपाच्या अरुणा पाटकर यांचा 9 विरुध्द 8 मतांनी पराभव करुन मिताली सावंत या उपनगराध्यक्षपदी विराजमान झाल्या आहेत.

यामुळे देवगड-जामसंडे नगरपंचायतीवरती शिवसेना राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा फडकला आहे. शिवसेनेचे नगरसेवक बुवा ऊर्फ निवृत्ती तारी,संतोष तारी,नितिन बांदेकर,विशाल मांजरेकर,रोहन खेडेकर,मनिषा घाडी,साक्षी प्रभू,तेजस मामघाडी तर राष्ट्रवादीच्या मिताली सावंत व भाजपाच्या प्रणाली माने,अरुणा पाटकर,तन्वी चांदोस्कर,शरद ठुकरुल,स्वरा कावले,रुचाली पाटकर,मनिषा जामसंडेकर,आदया गुमास्ते असे नवीन नगरसेवक आहेत. यामध्ये सेना भाजपाचे 8-8 तर राष्ट्रवादीच्या 1 असे पक्षीय बलाबल आहे. यावेळी नुतन नगराध्यक्ष साक्षी प्रभू बोलताना म्हणाल्या की, देवगड-जामसंडे नगरपंचायतीचा विकास करतेवेळी सर्व जनतेला विश्वासात घेवून या नगराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आपला प्रयत्न असणार आहे. जनतेने आपल्यावरती टाकलेला विश्वास नक्कीच सार्थकी लावून जनतेच्या मनातील विकास यापुढे केला जाणार आहे. देवगड-जामसंडे नगरपंचायतीला सर्वात मोठी समस्या हि पाणी प्रश्नाची आहे. हा पाणी प्रश्न सर्व प्रथम सोडविण्यासाठी आपण प्रयत्न्‍ करणार आहोत .

यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी दिलेले पाणी प्रश्नाचे आश्वासन हे पुर्ण करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नगराध्यक्ष निवडीच्यावेळी खासदार विनायक राऊत,शिवसेना नेते संदेश पारकर,सुशांत नाईक,अरुण दुधवडकर,आप्पा पराडकर,राष्ट्रवादी नेते नंदुशेठ घाटे,निलम पालव सावंत,तालुकाध्यक्ष विलास साळसकर,तालुकाध्यक्ष मिलिंद साटम,अमोल लोके,जिल्हा परिषदेच्या सदस्या वर्षा पवार,हर्षा ठाकुर,अनंत पिळणकर,किरण टेंबुलकर,रविंद्र जोगल,गणेश वाळके,अण्णा खवळे आदी शिवसैनिक उपस्थित होते. फोटो- नुतन नगराध्यक्ष साक्षी प्रभू व नुतन उपनगराध्यक्ष मिताली सावंत यांचे अभिनंदन करताना शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक आदी. छाया-वैभव केळकर

You cannot copy content of this page