कणकवली तालुका पत्रकार समितीचा 27 फेब्रुवारीला पुरस्कार वितरण कार्यक्रम

निबंध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करणार; पत्रकार व कुटुंबियांचे स्नेहसंमेलन

*⚡कणकवली ता.१४-:*कणकवली तालुका पत्रकार समितीच्यावतीने देण्यात येणारे पत्रकारीता , उद्योजक व सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण कार्यक्रम रविवार २७ फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी १० वा पिसेकामते येथील मैत्री रिसॉर्ट येथे मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे . यावेळी तालुका पत्रकार समितीच्यावतीने जाहिर करण्यात आलेल्या निबंध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषीके देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . तसेच पत्रकार व कुटुंबियांचे स्नेहसंमेलनही होणार आहे . कणकवली तालुका पत्रकार समितीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर देसाई यांच्या अध्यक्षतेखाली तेलीआळी येथील भवानी हॉलमध्ये झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला . यावेळी तालुका सचिव संजय राणे , खजिनदार नितीन कदम , जिल्हा उपाध्यक्ष रमेश जोगळे , जिल्हा कार्यकारिणी सदस्य सुधीर राणे , ज्येष्ठ पत्रकार अशोक करंबेळकर , माजी तालुकाध्यक्ष लक्ष्मीकांत भावे ,भगवान लोके , विरेंद्र चिंदरकर , भास्कर रासम, तुषार सावंत , राजेश सरकारे , संजय पेटकर , विनोद जाधव , तुषार हजारे , दिगंबर वालावलकर , उमेश बुचडे आदी उपस्थित होते . तालुका पत्रकार समितीच्यावतीने बाळशास्त्री जांभेकर स्मृती ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार आनंद अंधारी , शशी तायशेटे स्मृती उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सुधीर राणे यांना , अनिल सावंत स्मृती ग्रामिण पत्रकार पुरस्कार ऋषीकेश मोरजकर यांना तर उत्कृष्ट छायाचित्रकार पुरस्कार गुरुप्रसाद सावंत यांना जाहिर करण्यात आला आहे . तर यशस्वी उद्योजक पुरस्कारासाठी ज्येष्ठ उद्योजक आर . एम . नाईक व विल्बर्ट प्रॉपर्टीज यांची तर सामाजिक कार्यकर्ता पुरस्कारासाठी हेल्प अॅकॅडमी फोंडाघाटचे संजय नेरूरकर यांची निवड करण्यात असून त्यांना यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे . तसेच तालुका पत्रकार समितीला नेहमीच सहकार्य करणारे सामाजिक कार्यकर्ते चंद्रशेखर उपरकर यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे . पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर तालुक्यातील पत्रकार व कुटुंबियांसाठीचे स्नेहसंमेलनही त्याच ठिकाणी होणार आहे . यात महिलांसाठी खेळ पैठणीचा व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत . या कार्यक्रमाच्या नियोजनाच्या अनुषंगानेही यावेळी चर्चा करण्यात आली . शेवटी नितीन कदम यांनी आभार मानले .

You cannot copy content of this page