नागरी पुरवठामंत्री ना.छगन भुजबळ व जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार:अमित सामंत
कुडाळ ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भात खरेदी ची मुदत संपत आली असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे भात खरेदी करणे बाकी आहे अशा ह्या शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण खात्याचे मंत्री छगन भुजबळ व जिल्हाधिकारी याच्याशी चर्चा करून मुदतवाढ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
तर एकही शेतकरी भट खरेदीपासून वंचित राहणार नसल्याची खबरदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून घेईल जाईल असेही ते म्हणाले
