संतोष परब हल्लाप्रकरणी गोट्या सावंत यांना न्यायालयाचा दणका ; 2 दिवसाची पोलीस कोठडी

कणकवली 14 फेब्रुवारी (प्रतिनिधी)– जिल्हा बँक निवडणुकीदरम्यान जिल्हा बँकेचे तत्कालीन अध्यक्ष सतीश सावंत यांचे निवडणूक प्रचारप्रमुख, शिवसैनिक संतोष परब हल्लाप्रकरणी कणकवली न्यायालयात शरण आलेल्या माजी जि. प. अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांना 2 दिवसाची म्हणजेच 16 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सरकारी पक्षाच्या वतीने वकील प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद करताना सुप्रीम कोर्टापर्यंत गोट्या सावंत यांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्याचे सांगत पोलीस तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली. प्रदिप घरत यांच्या युक्तीवादला हरकत घेताना गोट्या सावंत यांचे वकील राजेंद्र रावराणे व उमेश सावंत यांनी गोट्या सावंत यांचा संतोष परब हल्ल्यात पोलिसांच्या तपासात गोट्या सावंत यांचा सहभाग आढळून आला नाही.

त्यामुळे पोलीस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडीची मागणी केली. दोन्ही बाजूच्या युक्तिवादानंतर न्यायाधीश सलीम जमादार यांनी गोट्या सावंत यांना दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली. संतोष परब हल्ल्याप्रकरणी न्यायालयाच्या ताब्यात गेलेल्या गोट्या सावंत यांच्या विरोधात पोलिसांकडून आपली बाजू मांडण्यासाठी कणकवली पोलीस दाखल झाले होते. या सुनावणीदरम्यान कणकवली न्यायालयामध्ये माजी खासदार नीलेश राणे, जि.प. अध्यक्ष संजना सावंत, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजु परब, विशाल परब, कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,पंचायत समिती उपसभापती मिलिंद मेस्त्री यांच्यासह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page