न्हिवे ब्राह्मणदेव मंदिरात २७ रोजी कार्यक्रम

मालवण ता.१४-:* न्हिवे येथील ब्राह्मण देवालय येथील ब्राह्मणदेव मूर्ती प्राणप्रतिष्ठापनेच्या २७ व्या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त २७ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. लघुरुद्र, दुपारी १२ वा. आरती, १ ते २.३० वा. महाप्रसाद, ३ वा. सत्यनारायण महापूजा, सायंकाळी ६ वा. आरती व तीर्थप्रसाद, ७ वा. स्थानिक भजने, रात्री ९.३० वा. गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ, १० वा. ब्राह्मणदेव तरुण नाट्य मंडळ, न्हिवे यांचा दशावतारी नाट्यप्रयोग ‘रामभक्त जांबुवंत’ सादर होणार आहे.

सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page