Headlines

आयुर्वेद हे जीवनाचे तंत्र…

डॉ. अजित राजगिरे यांचे प्रतिपादन…

वेंगुर्ला प्रतिनिधी– आयुर्वेद हे जीवनाचे तंत्र आहे. शमन चिकित्सा आणि शोधन चिकित्सामार्फत रुग्णांवर उपचार केले जातात. वात, कफ आणि पित्त हे दोष समतोल असणे आवश्यक आहे. वमन, विरेचन, बस्ती नस्य आणि रक्त मोक्षण पंचकर्माद्वारे शरीरातील दोष काढता येतात व त्यामुळे आरोग्य चांगले राहते, असे प्रतिपादन डॉ. अजित राजगिरे यांनी वेंगुर्ला येथे केले.

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्यामार्फत आयुर्वेद व पंचकर्म या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ.अजित राजगिरे बोलत होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास देऊलकर होते. आपल्या व्याख्यानात डॉ.अजित राजगिरे पुढे बोलताना म्हणाले की, केरळ प्रमाणेच आयुर्वेद केंद्र चालवण्याची क्षमता कोकणात आहे.

अनेक महत्वाच्या औषधी वनस्पतींची उपलब्धता कोकणात आहे. विद्यार्थ्यांनी सार्थ आयुर्वेद सेंटर माडखोडला भेट देऊन आयुर्वेद अभ्यासाकडे व्यवसाय व संधी म्हणून पहावे. तसेच प्राचार्य डॉ. विलास देऊलकर यांनी पंचकर्म केल्याने आपली पचनक्रिया सुधारते. शरीराला आणि मनाला स्वस्थता मिळते व आपले जीवन निरोगी राहते, असे मत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर महिला विकास कक्षच्या चेअरमन डॉ.धनश्री पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रम अधिकारी प्रा.सदाशिव चुकेवाड, सार्थ आयुर्वेदचे चेअरमन डिसोझा आदी उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्रा.वामन गावडे, प्रा.विवेक चव्हाण, डॉ.पी.आर.गावडे, डॉ.बी.जी.गायकवाड, प्रा.एल.बी.नैताम, प्रा.जी.एस.म्हेत्रे, प्रा.डॉ.वसंत पाटोळे, प्रा.के.आर.कांबळे, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक महिला विकास कक्षच्या चेअरमन प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी, सूत्रसंचालन प्रा.वेदिका सावंत यांनी व प्रा.पवीण देसाई यांनी आभार मानले.

You cannot copy content of this page