मालवण ता.१४-: मनपा कलावंत संघटना, मुंबई अंतर्गत श्रीमती कमल वसंत जाधव करंडक खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा कणकवली येथे पार पडली. या स्पर्धेत मालवण मधील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागामार्फत आजी माजी विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या ‘ठसका’ एकांकीकेने सहभाग घेतला होता.
या एकांकिकेतील सुशांत पवार यांना स्पर्धेतील उत्कृष्ट पुरुष कलाकार म्हणून तर सौ. शुभदा टिकम यांना उत्कृष्ट स्त्री कलाकार म्हणून अभिनय पुरस्काराने गौरविण्यात आले. सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या या एकांकिकेत देवेन कोळंबकर, सचिन टिकम, शुभदा टिकम, सुशांत पवार, अभय कदम, जान्हवी बिरमोळे, प्रथमेश सामंत, मिताली नेरकर, सौम्या कुरले, लक्ष्मी नेरकर, एकनाथ तोडणकर, सर्वेश परुळेकर, ओम मालवणकर, अद्वैत टिकम आदी कलाकारांनी सहभाग घेतला होता.
या एकांकीकेचे दिग्दर्शन प्रशांत केणी, नेपथ्य देवेन कोलंबकर व सर्वेश परूळेकर यांनी तर पार्श्वसंगीत रोहित कुडे व सर्वेश परुळेकर यांनी केले. ही एकांकिका चैतन्य देशपांडे यांनी लिहिली आहे. यावेळी महाविद्यालयाचे सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.हंबीरराव चौगले, सहायक प्रा.प्रमोद खरात तसेच विद्यार्थी किरण करवडकर, पंकज कवटकर, प्रवीण नडगेरी आदी विद्यार्थी उपस्थित होते. या यशाबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सामंत, सर्व प्राध्यापक, संस्थेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पंतवालावलकर, सचिव गणेश कुशे साईनाथ चव्हाण यांनी सहभागी आजी माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
