मालवण ता.१४-:* मालवणच्या माजी नगरसेविका ममता वराडकर, माजी नगरसेवक गणेश कुशे यांच्या वतीने मंगळवार दि.१५ फेब्रुवारी रोजी आधारकार्ड दुरुस्ती व नवीन आधार नोंदणी तसेच ई श्रम कार्ड शिबीराचे आयोजन कचेरी रोड मेढा, मालवण येथील फातिमा कॉन्व्हेंट समोर प्रशांत मांजरेकर यांचे हॉटेल मालवणी मेजवानी येथे करण्यात आले आहे. सकाळी १० ते ५ या वेळेत आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन वराडकर, कुशे यांच्या वतीने करण्यात आले आहे.
आधार नोंदणी- दुरुस्ती व ई श्रम कार्ड शिबिराचे आयोजन
