सिंधुमित्र प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने निःशुल्क आरोग्य शिबिर संपन्न…

सावंतवाडी ता.१४-: येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाच्या सावंतवाडी शाखेच्यावतीने रविवारी सावंतवाडीत आर. पी. डी. हायस्कूलमध्ये प्राथमिक शिक्षक आणि शिक्षिकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या नि:शुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिराचा लाभ सुमारे १५० प्राथमिक शिक्षक व शिक्षिकांची तपासणी करून त्यांना औषधे देण्यात आली.

ग्रामीण व अतिदुर्गम भागातील गरजू रुग्णांना तालुक्याच्या ठिकाणाची आरोग्य सेवा मिळण्याच्या उद्देशाने गेले एक तप हे प्रतिष्ठान कार्यरत आहे. यासाठी अतिदुर्गम व दुर्गम गावांचीच निवड केली जाते. या प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ प्रविणकुमार ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्यासह शैक्षणिक, सामाजिक व प्रबोधनात्मक अभिनव उपक्रम सातत्याने राबविले जातात. देशाची भावी पिढी घडविणारे शिक्षक शिक्षिका आपल्या शैक्षणिक सेवेत व्यस्त असताना स्वत:च्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. म्हणूनच त्यांची आरोग्य तपासणी करण्याच्या उद्देशाने सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानने या शिबिराचे आयोजन करण्यात केले होते.

You cannot copy content of this page