भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा

सुरेश भोगटे यांची मुख्याधिकारी जावडेकर यांच्याकडे मागणी

सावंतवाडी ता.१४-: शहरातील अनेक भागांमध्ये मोकाट कुत्रे हौदोस घालत असून, दोन दिवसांपूर्वी वैश्यवाडा परिसरातील काही भटक्या कुत्र्यांनी काही नागरिकांवर हल्ला करून, त्याचा चावा घेऊन त्या नागरिकांना जख्मी केले आहे. याबाबत वारंवार मागणी करून देखील या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यानेच हे हल्ले होत आहेत. याबाबत वेळीच कारवाई करून सबंधित भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा. अशी मागणी माजी नगरसेवक सुरेश भोगटे यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

You cannot copy content of this page