जि.प.,पंस.निवडणुका लढवण्याबाबतची चर्चा होणार
कणकवली ता.१४-:* सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वाची बैठक मनसे राज्य सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली बुधवार १६ फेब्रुवारी ब२०२२ रोजी सकाळी १०.३० वा. मनसे मध्यवर्ती कार्यालय, कणकवली येथे आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत महत्त्वाचे विषयावर चर्चा तसेच विचार विनिमय होणार असून मुंबई येथे राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख नेते व वरिष्ठ पदाधिकारी यांच्यात झालेल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे व घेतलेल्या भूमिकेविषयी सांगण्यात येणार आहे. तसेच आगामी जि.प.,पंस.निवडणुका लढवण्याबाबतची चर्चा होणार असुन सर्व तालुका अध्यक्ष यांनी मतदारसंघनिहाय रचना सोबत आणणे आवश्यक असुन वेळीच उपस्थित रहावे.
तरी सदर बैठकीला मनसे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष, सर्व उपजिल्हाध्यक्ष, सर्व तालुका अध्यक्ष,तालुका सचिव, उपतालुका अध्यक्ष, शहर अध्यक्ष, मनविसे जिल्हा अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, महिला पदाधिकारी, परिवहन तसेच सर्व सेलचे पदाधिकारी, आजी माजी सर्व पदाधिकारी व ग्रामपंचायत सदस्य यांनी वेळीच उपस्थित रहावे.असे आवाहन मनसे सिंधुदुर्ग जिल्हा सचिव सहदेव उर्फ बाळा पावसकर यांनी केले आहे.
