कोकणभूषण स्वर्गीय विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे २६ फेब्रुवारीला आयोजन…

सावंतवाडी ता 14: येथील आरती मासिक, श्रीराम वाचन मंदिर व कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी या संस्थांच्या संयुक्त विद्यमाने ज्येष्ठ कवी, कादंबरीकार व कोकणभूषण स्वर्गीय विद्याधर भागवत स्मृती काव्यवाचन स्पर्धेचे आयोजन शनिवार दिनांक २६ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता येथील श्रीराम वाचन मंदिर सभागृहात संपन्न होणार आहेत. तरी या काव्यवाचन स्पर्धेत कवी कवयित्रींनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा खुल्या गटासाठी असून सिंधुदुर्ग, गोवा व कर्नाटक सीमा भागातील कवींना आपली स्वरचित कविता सादर करता येणार आहे. यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींना कवींनी आपली नावे २५ फेब्रुवारी पर्यंत ज्येष्ठ कवी विठ्ठल कदम यांच्याकडे नोंद करावयाची आहेत. स्पर्धेतील प्रथम क्रमांक कवीस रोख रूपये ५०१ व प्रशस्तीपत्रक, द्वितीय क्रमांकास रोख रुपये ४०१ व प्रशस्तीपत्र , तृतीय क्रमांकास रोख रुपये ३०१ व प्रशस्तीपत्रक तसेच उत्तेजनार्थ क्रमांकास रुपये १०१ व प्रशस्तीपत्रक देण्यात येणार आहे. तसेच काव्यवाचन स्पर्धेतील सहभागी असणाऱ्या प्रत्येक कवीला सहभाग प्रमाणपत्र आयोजकांतर्फे दिले जाणार असून उत्कृष्ट कविता आरती मासिकातून प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.

तरी कवी-कवयित्रींनी तसेच साहित्य रसिकांनी काव्यवाचन स्पर्धेत सहभाग घेऊन मराठी भाषेला अभिवादन करावे, असे आवाहन चिंतामणी साहित्य प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष कें.गं.भागवत, आरती मासिकाचे संपादक डॉ.जी.ए.बुवा, ज्येष्ठ साहित्यिका उषा परब, प्रभाकर भागवत, भरत गावडे, कवी विठ्ठल कदम, श्रीराम वाचनालयाचे अध्यक्ष ॲड.दीपक नेवगी, कोकण मराठी साहित्य परिषदेचे सावंतवाडी शाखेचे अध्यक्ष सुभाष गोवेकर, सचिव प्रा.प्रतिभा चव्हाण यांनी केले आहे.

You cannot copy content of this page