अल्पवयीन मुलावर केला होता काल रात्री हल्ला
कणकवली ता.१४-: कणकवली येथील एका अल्पवयीन युवकावर ब्लेडने वार करत जख्मी केल्याची घटना काल रात्री आठ वाजण्याच्या सुमारास गणपती साना येथे घडली असून, याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या नशेत सबंधित युवकाने त्या अल्पवयीन मुलावर हल्ला केल्याची माहिती प्राप्त झाली असून, अधिक तपास पोलिस हवालदार श्री. येडवे करत आहेत.
