जिल्हा बँक शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून काम करतेय

बँक अध्यक्ष मनीष दळवी

वैभववाडी प्रतिनिधी जिल्हा बॕंक शेतकरी केंद्रबिंदू मानून ही बँक काम करत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुणांनी बँकेच्या मदतीने लघु उद्योग उभारले पाहिजेत. शेतीबरोबर शेतीपूरक व्यवसाय उभारण्यासाठी शेतकऱ्यांना जिल्हा बँक सदैव सहकार्य करेल असे प्रतिपादन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. हेत येथे सिंधुवैभव दुग्ध उत्पादक संस्थेच्यावतीने जिल्हास्तरीय शेतकरी मेळावा आणि व्यापार ओळख ( ट्रेडमार्क) उदघाटन प्रसंगी दळवी बोलत होते.यावेळी वैभववाडी पं.स.चे माजी उपसभापती भालचंद्र साठे, जिल्हा बँकेचे सर व्यवस्थापक अनिरुध्द देसाई, भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, कोल्हापूर दुग्ध सहकार महाविद्यालयचे प्रा. डॉ. नेताजी महादेव पाटील, हेत सरपंच किशोर कांबळे, भुईबावडा दुग्ध संस्थेचे अध्यक्ष अरुण मोरे, श्री केदारलिंग सोसायटीचे अध्यक्ष संतोष शांताराम फोंडके, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ.नितीन रेडकर, श्री.डॉ. व्यंकटेराव आकाराम जामदार, वैभववाडी तालुका खरेदी-विक्री संघाचे चेअरमन महेश संसारे, भुईबावडा सरपंच बाजीराव मोरे, श्री पप्पू इंदुलकर व शेतकरी, मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे उदघाटन सिंधुदूर्ग बँकेचे अध्यक्ष श्री मनिष प्रकाश दळवी यानी केले. सिंधुवैभव दुग्ध उत्पादक संस्थेचे संस्थापक श्री. रामचंद्र बाळकृष्ण फोंडके यानी सर्वांचे स्वागत केले.

भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान कुडाळचे अध्यक्ष डॉ. प्रसाद वामन देवधर यांनी भौगोलीक परिस्थितीचा आढावा आणि हेत गावामध्ये झालेलें धरण यातुन मिळणारा फायदा शेतकऱ्याना कसा होईल आणि आपला परिसर सुजलम सुफलम कसा होईल याची जाणीव उपस्थित शेतकऱ्याना करुन दिली. भालचंद्र साठे, डॉ. नेताजी पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सिंधुवैभव दुग्ध उत्पादक संस्थेचे संस्थापक रामचंद्र फोंडके म्हणाले, आपल्या गावातील प्रत्येक शेतकरी सुखी व सधन झाला पाहिजे. तरुणांची शहराकडे असणारी धाव थांबली पाहिजे. गावामध्ये रोजगार निर्मिती उभारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

आपण दहा वर्षांपूर्वी वरकस जमिन लागवडी आणली. तसेच आपल्याकडे 25 महैशींचा तबेला आहे. दरदिवशी सव्वाशे लिटर दुध मिळते असे सांगितले. इतरांनी ही असे व्यवसाय उभारण्यासाठी पुढे आले पाहिजे. हेत गावामध्ये 250 लिटर दुध गोकुळाला दिले जाते. येणाऱ्या वर्षभरात हा आकडा 500 लिटरवरती जाईल असा विश्वास फोंडके यांनी व्यक्त केला.

सिंधुवैभव या ट्रेडमार्कखाली परिसरातील काजू विकत घेऊन त्याना योग्य तो हमीभाव देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला आहे. यावेळी मोठ्या संख्येने तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. फोटो – हेत येथे शेतकरी मेळाव्यात मार्गदर्शन करताना जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी. यावेळी उपस्थित मान्यवर.

You cannot copy content of this page