शासकीय कर्मचाऱ्यांचा तालुका म्हणून वैभववाडीची ओळख व्हावी

सत्यवान रेडकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

वैभववाडी प्रतिनिधी वैभववाडी तालुक्याची ओळख शासकीय कर्मचाऱ्यांचा तालुका अशी व्हायला हवी. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय वेडे व्हा.यश नक्की मिळेल असा आत्मविश्वास सीमाशुल्क विभागाचे अधिकारी तथा तिमीरातून तेजाकडे संस्थेचे संस्थापक सत्यवान रेडकर यांनी विदयार्थ्यांना दिला. तिमीरातून तेजाकडे या संस्थेच्यावतीने अ.रा.विदयालय वैभववाडी येथे शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून रेडकर बोलत होते. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था अध्यक्ष श्री जयेंद्र रावराणे प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.बी.एस.नादकर,श्री शिंगाडे ,श्री चव्हाण श्री नारकर, तसेच प्रशालेचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, पालक ,विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक श्री.शिंदे यांनी केले. सूत्रसंचलन श्रीमती पी.पी.सावंत यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री नादकर सर यांनी केले.

You cannot copy content of this page