बाबा परब मित्रमंडळाच्या वतीने निलेश राणे चषक २०२२ चे आयोजन

जिल्हा बँक संचालक बाबा परब यांची माहिती…

मालवण ता.१३-: बाबा परब मित्रमंडळ मालवण यांच्यावतीने आणि मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने भाजपचे प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दि २३ मार्च ते २७ मार्च या कालावधीत मालवणच्या टोपीवाला बोर्डींग मैदानावर राष्ट्रीय स्तरावरील खुली टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा ‘निलेश राणे चषक २०२२ चे आयोजन करण्यात आल्याची माहिती स्पर्धा प्रमुख तथा सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक बाबा परब यांनी दिली.

या स्पर्धेविषयी महिती देतांना श्री बाबा परब म्हणाले, स्पर्धेतील अंतिम विजेत्या संघास ३ लाख रुपयाचे रोख पारितोषिक आणि आकर्षक निलेश चषक देण्यात येणार असून , उपविजेत्या संघास एक लाख पन्नास हजार रुपये रोख व आकर्षक निलेश चषक देण्यात येणार आहे याशिवाय वैयक्तिक स्तरावरील बक्षिसे मालिकावीर , उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट यष्टिरक्षक, अंतिम सामन्यातील उत्कृष्ट सामनावीर, प्रत्येक पराभुत संघातिल सामनावीर यांचा सन्मान तसेच क्रीडा स्पर्धेत उल्लेखनिय, कामगिरी केलेल्या खेळाडूंचा तसेच जेष्ठ खेळाडूंचे सन्मान निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात येणार आहेत.

स्पर्धेसाठी विविध समिती व समिती प्रमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सत्कार समारंभ समिती प्रमुख नंदन देसाई, मैदान समिती व तांत्रिक समिती प्रमुख नितिन मांजरेकर, व्यासपिठ समिती प्रमुख अजय शिंदे़ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी रुपये १५ हजार रुपये असून संघ नोंदणी अंतिम तारीख १० मार्च २०२२ अशी आहे. संघाची नोंद स्पर्धा आयोजक बाबा परब (9420738382) तसेच मोहन सायकल स्टोअर्स मालवण, नितिन मांजरेकर (9823526969), उमेश मांजरेकर (9420262538), शेखर मांजरेकर यांजकडे द्यावी. अशी माहिती बाबा परब मित्रमंडळ व मालवण स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या वतीने देण्यात आली.

You cannot copy content of this page