लायन्स क्लब मालवणचे भविष्य उज्ज्वल…

रिजनल चेअरमन संजय पटेल यांचे प्रतिपादन….

मालवण ता.१३ मालवण लायन्स क्लब समाजासाठी चांगले काम करत आहे. त्यामुळेच लायन्स क्लब मालवणचे भविष्य उज्जल आहे, असे प्रतिपादन लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन संजय पटेल यांनी मालवण लायन्स क्लबच्या भेटीप्रसंगी केले. लायन्स क्लबचे रिजनल चेअरमन संजय पटेल यांनी मालवण लायन्स क्लबला भेट दिली.

प्रारंभी मालवण लायन्स क्लबचे अध्यक्ष विश्वास गावकर यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर जयश्री हडकर यांनी अहवाल वाचन केले यावेळी मालवण लायन्स क्लबने लायन्स क्लबच्या येथील माजी अध्यक्ष व समाजातील कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वांचा सत्कार आयोजित केला होता. यात नीट परीक्षेमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेला आशय हरिश परुळेकर, तौक्ते वादळामध्ये मदतकार्य करणारे चेंदवणकर वायरमन, मातृत्व आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष संतोष लुडबे, मेगल डिसोजा व टिम यांचा प्रामुख्याने समावेश होता. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मीना घुर्ये, दिक्षा गावकर, गणेश प्रभुलकर यांनी केले तर आभार अनुष्का चव्हाण यांनी मानले.

You cannot copy content of this page