कणकवली ता.१३-:* देवगड तालुक्यातील बापार्डे राणेवाडी येथील प्रमोद वासुदेव राणे हा युवक सीए (चार्टर्ड अकाऊंटंट) ही परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. तब्बल नऊ वर्षे मेहनत घेत त्याने ही परिक्षा उत्तीर्ण केली. प्रमोद याचे दहावीपर्यंतचे शिक्षण कणकवली येथील एसएम हायस्कुल येथे झाले.
बारावीचे शिक्षण कोल्हापूर वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय तर बीकॉमचे शिक्षणही कोल्हापूर येथे झाले. प्रमोद याने अकरावीमध्ये प्रवेश घेण्यापूर्वीच ‘सीए’चे ‘टार्गेट’ ठेवले होते. बारावीनंतर त्याने आयसीएआय संस्थेतून ‘सीए’च्या तीन परिक्षा दिल्या. या परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याला नऊ वर्षे लागली आणि १०फेब्रुवारीला निकाल जाहीर होत तो परिक्षा उत्तीर्ण झाला. प्रमोद याला आई, वडील तथा निवृत्त पोलीस अधिकारी वासुदेव राणे, भाऊ विनोद राणे, बहीण सौ. स्वरा राऊळ, सीए अण्णासाहेब नाईक, सीए शैलेश नाईक यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल प्रमोद याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
