आंबेरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संचालक पदाची निवड बिनविरोध…

मालवण दि प्रतिनिधी आंबेरी विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्था मर्यादित चौके या संस्थेच्या संचालक पदाची निवड बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी जाहीर केले. आंबेरी विविध विकास कार्यकारी सहकारी सेवा संस्थेच्या १३ संचालक पदांसाठी – १३ अर्ज आले. त्यामुळे सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी अजय हिर्लेकर यांनी जाहीर केले.

यामध्ये संचालक म्हणून संतोष गावडे, कमलाकर गावडे, देवदत्त सामंत, राजन गावडे, अजित गावडे, अशोक शृंगारे दत्तात्रय गावडे, धोंडी नाईक, ललिता गोसावी, सुलोचना तावडे, सुरेश चौकेकर, कृष्णा करलकर, लक्ष्मण गोसावी या १३ संचालकांची बिनविरोध निवड झाली आहे. बिनविरोध करण्यासाठी दत्ता सामंत, कृ. बा. करलकर, सुरेश चौकेकर, राजा गावडे, कमलाकर गावडे, बिजेंद्र गावडे, संतोष गावडे यांनी प्रयत्न केले. आंबेरी सेवा सोसायटीवर बिनविरोध संचालकांच्या निवडीबद्दल गावातील ग्रामस्थ, शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त करून निवडून आलेल्या सर्व संचालकांचे अभिनंदन केले आहे.

You cannot copy content of this page