प्रभाग 9 व 10 मधील नागरिकांसाठी ई श्रम कार्ड नोंदणी शिबिर संपन्न…

मालवण : (प्रतिनिधी) मालवणचे माजी नगराध्यक्ष आणि नगरसेवक सुदेश आचरेकर, माजी नगरसेविका स्नेहा आचरेकर व माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या संयुक्त विद्यमाने आज रविवारी मालवण भाजप कार्यालयात प्रभाग ९ व १० मधील नागरिकांसाठी मोफत ई श्रम कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ११० जणांनी लाभ घेतला केंद्र शासनाने असंघटित कामगारांसाठी श्रमिक लेबर कार्ड योजना सुरू केली आहे. यात कल्याणकारी योजनांचा लाभ, रोजगाराच्या अनेक संधी तसेच दोन लाखांचा मोफत विमा असणार आहे. या योजनांसाठी नागरिकांची ई श्रम कार्ड नोंदणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयात सुदेश आचरेकर, स्नेहा आचरेकर व दीपक पाटकर यांच्या माध्यमातून ई श्रम कार्ड शिबीर आयोजित करण्यात आले.

यावेळी सुदेश आचरेकर यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आढावा आपल्या मनोगतात घेत ई श्रम कार्ड नोंदणीची महत्व स्पष्ट केले यावेळी माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्यासह भाजप युवा मोर्चा शहर अध्यक्ष ललित चव्हाण, आबा हडकर, निकीत वराडकर, पंकज गावडे यासह अन्य भाजप पदाधिकारी उपस्थित होते. कार्ड नोंदणीसाठी कृष्णा साळसकर, नम्रता साळसकर, कृपा मयेकर, अक्षता गोसावी, प्रियांका कासले, भाग्यश्री शिंदे यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page