देवगड ता.१३-:* श्री क्षेत्र कुणकेश्वर महाशिवरात्री यात्रा दिनांक १ मार्च व २मार्च २०२२ रोजी प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होणार आहे. या धार्मिक पवित्र तिर्थक्षेत्री धार्मिक विधी व तिर्थस्नानासाठी देवभेटीसाठी आणि दर्शनासाठी महाशिवरात्री दरम्यान पर्वणी साधून भाविक भक्त येत असतात. त्यांच्या सुखसोयीच्या दृष्टीने योग्य नियोजन ट्रस्ट मार्फत चालू आहे.
या वर्षी भाविक भक्तांसाठी सुलभ दर्शन व्यवस्था आणि सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शासन-प्रशासन व देवस्थान ट्रस्ट आणि ग्रामपंचायत कुणकेश्वर माध्यमातून नियोजन होणार असून लवकरच जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली यात्रा नियोजन बैठक् होणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष् संतोष लब्दे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. कुणकेश्वर ट्रस्ट ची बैठक नुकतीक संपन्न झाली यावेळी ट्रस्टचे विश्वस्त मंडळ उपस्थित होते. या नियोजन बैठकी दरम्यान आरोग्य व्यवस्था,पोलीस बंदोबस्त- सुरक्षा व्यवस्था ,विदयुत व्यवस्था,पार्किंग व्यवस्था,वाहतुक व परीवहन व्यवस्था आणि येण्या जाण्याचे मार्ग बाबत आढावा घेतला जाणार आहे.
देवस्थान ट्रस्ट मार्फत मंदिर परिसरव यात्रा परिसर ठिकाणी योगय ते नियाजोजन करण्यात आले असून कामे युध्दपातळीवर चालू आहेत. तरी अपुरे कामे यामध्ये कुणकेश्वर ग्रामपंचायत ते मांजरेकर नाका रस्त्याची दुरावस्था,कुणकेश्वर शाळा जिल्हा परिषद कुणकेश्वर मंदिर व्हीआयपी रस्ता दुरावस्था,कुणकेश्वर तळी ते दहेगाव चेकपोस्ट धनगरवाडी मार्गे रस्ता दुरवस्था,रस्त्यालगत वाढलेली मोठ्या प्रमाणात झाडी, बीएसएनएल टॉवरची लाईट गेल्यावर नेटवर गुगुल,मन मंदिर परिसरातील तलावाचे काम गेल्या दोन वर्षापासून संथगतीने सुरू आहे हि काम तत्काळ पूर्ण व्हावे अशी मागणी देवस्थान ट्रस्ट ते उपाध्यक्ष दिनेश दिवाळी यांनी पत्रकार परिषदेत केली.यावेळी सचिव शरद वाळके,खजिनदार अभय पेडणेकर,सदस्य संतोष लाड,संजय आचरेकर,प्रकाश वाळके,पदसिद्ध सदस्य श्रीकृष्ण बोडाळे,उपस्थित होते.
