कणकवली ता.१३-:* मुंबई गोवा महामार्गवर कणकवली हुंबरठ येथे इनोव्हा कार व खाजगी बसचा सकाळी १० च्या दरम्यान अपघात झाला आहे. यामध्ये तीन जण गंभीर तर पाच जणांना ही मोठी दुखापत झाली आहे. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इनोव्हा कार गोव्याच्या दिशेने जात असताना दुरुस्तीसाठी थांबलेल्या खाजगी बसवर इनोव्हा कार धडकली असल्याची समजते.इनोव्हा कारमध्ये बहुतांशी महिला प्रवास करत असल्याने त्यांनाही गंभीर इजा झाली आहे घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलिसानी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल केले. यामुळे स्थानिक रहिवासी नंदन पाटील यांच्यासह इतर जणांनी जखमींना रुग्णालयात नेण्यासाठी मोठी मदत केली. यावेळी वाहतूक पोलीस संदेश आबिटकर व सागर मासाळ हे उपस्थित होते.
