कणकवली 13 फेब्रुवारी (प्रतिनिधी)- सिंधुदुर्गातील तरुणांनी आपल्या जिल्हातील परंपरा संस्कृती जगातील प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहाचवण्यास पुढाकार घेतला पाहिजे असे प्रतिपादन पदमश्री परशुराम गंगावणे यांनी केले. कणकवली येथील रिगल कॉलेज ऑफ हॉटेल अॅण्ड टुरिझम मॅनेजमेंट आयोजीत स्नेहसंमेलन व थीम डिनर ” हेलोवीन ट्रिक ऑर ट्रिट ” कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते . तृतीय वर्ष बी . एस . सी ( हॉस्पीटॅलीटी स्टडीज ) मुलांना मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत ” इव्हेंट मॅनेजमेंट ” विषयासाठी एखादया कार्यक्रमासाठी आयोजन करायचे असते .
त्यासाठी विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते . या कार्यकमास पदमश्री परशुराम गंगावणे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते . त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाचे सांस्कृतिक जिल्हा समन्वयक डॉ . आशिष नाईक उपस्थित होते . व्यासपीठावर जानवली गावच्या सरपंच सौ . शुभदा राणे , चेतन गंगावणे , रिगल संस्थेचे अध्यक्ष संजय शिर्के , रिगल संस्थेच्या संचालीका डॉ . सौ . सुमिता शिर्के , हॉटेल मॅनेजमेंट विभागाचे प्राचार्य पुरूषोत्तम आरोलकर , कॉम्प्युटर विभागाच्या प्राचार्या तृप्ती मोंडकर उपस्थित होत्या . पिंगुळी येथील कोकणातील संस्कृती तिचे जतन करण्याची गरज व पिंगुळी येथील कलादालन याबदद्दल माहिती दिली . डॉ . आशिष नाईक यांनी विद्यार्थ्यांना ध्येय डोळयासमोर ठेऊन वाटचाल करण्याबाबत मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्राध्यापिका सौ मधुरा सावंत यांनी केले तर आभार प्रा . शैलेश गावडे यांनी मानले .
