कणकवली 13 फेब्रुवारी (प्रतिनिधी)-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात बैठक रविवार 27 फेब्रुवारी 2022 रोजी होणार आहे . ही बैठक दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सकाळी 11 वाजता होणार असून ती दर महिन्याची मासीक बैठकच आहे.
व त्या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहावे. तसेच ही बैठक जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व मंडल संयोजक, शक्तिकेंद्र प्रमुख तसेच बूथ प्रमुख यांनी या बैठकीचे नियोजन करावे असे आवाहन भाजप प्रदेश चिटणीस तथा कोकण विभाग संयोजक मन की बात माजी आम.प्रमोद जठार ,माजी आमदार तथा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली ,जिल्हा सचिव तथा संयोजक मन की बात सिंधुदुर्ग बंड्या सावंत यांनी केले आहे.
