कणकवलीत भंगार सामान आगीत खाक

आग आटोक्यात आणण्यात यश आल्याने नुकसान टळले

कणकवली ता.१३-:* कणकवली शहरातील पंचायत समिती नजीक सर्विस रोडवर असलेल्या इंगळे भंगार व्यावसायिक यांच्या भंगार सामानाला शनिवारी रात्री 11.30 च्या दरम्यान अचानकपणे आग लागल्याने तारांबळ उडाली.आगीचे नेमके कारण समजू शकले नसते तरी शेकोटीची आग भंगार सामानापर्यंत गेली असावी असा संशय आहे.

आग लागल्याची माहिती कणकवली नगरपंचायतला कळताच कणकवली नगरपंचायतीचा अग्निशामक बंब दाखल होऊन आग विझवण्यात आल्याने पुढील अनर्थ टळला. या आगीत बहुतांशी भंगार सामानाचे नुकसान झाले आहे. आग लागल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली व नगरपंचायत बंब आल्याने आग आटोक्यात आली. यावेळी नगरपंचायत कर्मचारी गणेश लाड, समीर मोरे, मिथुन ठाणेकर, प्रकाश राठोड व स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझवण्यात आली.यावेळी कणकवली नगरपंचायत नगरसेवक कन्हैया पारकर तसेच चेतन अंधारी, चेतन मुंज यांच्यासह नागरिक वस्ती होते कणकवली शहरात सर्रास आगीच्या घटना घडत आहेत मागील वर्षभरात चार ते पाच ठिकाणी आग लागल्याच्या घटना घडल्या यामध्ये दुकाने, गॅरेज, भंगारवाले या सर्वच व्यावसायिकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. त्यामुळे आगीची मोठी झळ व्यपारी वर्गाला बसत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी देखील आग लागू नये यासाठी स्वतःहून काळजी घेणे गरजेचे असल्याचे बोलले जात आहे

You cannot copy content of this page