मालवण ता.१२-:* युवक काँग्रेस मालवण आणि मालवणी संस्कृती व वारसा मंडळ मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १३ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळेत मालवण बस स्थानक समोरील गद्रे दवाखाना येथे आयोजित करण्यात आले आहे.
या शिबिरात डोळ्यांच्या आजारावर मोफत तपासणी करून योग्य सल्ला दिला जाणार असून डोळ्यात मोतीबिंदू असल्यास त्यावर कमी खर्चात शस्त्रक्रिया केली जाईल. तरी गरजू व्यक्तींनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
