लिंगेश्वर युवा क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित शिबिरात ४५ दात्यांनी केले रक्तदान

कणकवली 12 फेब्रुवारी (प्रतिनिधी) – लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल परबवाडी आयोजित रक्तदान शिबिरात सुमारे ४५ दात्यांनी रक्तदान केले. कै. प्रमोद परब यांच्या स्मरणार्थ गेली १७ वर्षे सातत्याने हा उपक्रम लिंगेश्वर युवा कला क्रीडा मंडळ हळवल यांच्या वतीने राबविण्यात येत आहे.

शिबिराचा शुभारंभ डॉ. दिलीप घाडीगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मंडळाचे अध्यक्ष लवू परब, संस्थापक अध्यक्ष रवींद्र परब, हळवल उपसरपंच अरुण राऊळ, उपाध्यक्ष भरत गावडे, सचिव दिपेश परब, खजिनदार राकेश गावडे, वामन परब, दशरथ परब, विकास गावडे, दिपक राऊळ, आदींसह मंडळाचे कार्यकर्ते व सिंधुदुर्ग रक्तपेढी विभाग कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सुमारे ४५ दात्यांनी रक्तदान करत मोलाचे कार्य केले. सर्वांचा मंडळाच्या वतीने आभार मानत सन्मान करण्यात आला.

You cannot copy content of this page