बांदा ता.१२-:* डिंगणे-बांबरवाडी येथे गुरूवारी १७ फेब्रुवारी रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ३ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, त्यानंतर श्री स्थापेश्वर भजन मंडळ, डेगवे यांचा भजनाचा कार्यक्रम, भजनी बुवा तात्या स्वार यांचे भजन गायन,
तसेच चंद्रकांत उर्फ भाई सावंत (डींगणे – पाशीवाडी) यांचा जाहीर सत्कार होणार आहे. रात्री ८ वाजाता चेंदवणकर दशावतारी नाट्यमंडळाचा खास अध्यात्मिक “श्री स्वामी समर्थ ” नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले. रात्री सर्वं भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन स्थानिक ग्रामस्थ व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आले आहे.
