देवगड ता.१२-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यातिल देवगड तालुक्यातील मौजे कुणकेश्वर श्री देव स्वयंभू वार्षिक जत्रौत्सव २०२२,दि.१मार्च २०२२ व श्री देव रामेश्वर देवस्थान गिर्ये,-विजयदुर्ग रामेश्वर वार्षिक जत्रौत्सव,दि २६ फेब्रु ते २ मार्च रोजी होणार आहे.
या यात्रा उत्सवात मोठ्या प्रमाणात भाविक येतात.उत्सवाचे वेळी भाविकांच्या व्यवस्थेसाठी आवश्यक पायाभूत सुविधा,कायदा सुवव्यस्थेबाबत मा जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे अध्यक्षतेखाली,मंगळवार दि १५ फेब्रुवारी रोजी स.११.०० वा.यात्रा नियोजनाबाबत श्री देव स्वयंभू मंदिर कुणकेश्वर येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे.
तरी या बैठकीला संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्ययावत माहिती घेऊन उपस्थित रहावे.असे आदेश अप्पर जिल्हाधिकारी यांनी लेखी पत्राद्वारे दिले आहेत.
