विकास गुरव यांचा तिवरे गावातील बांधकाम कामगारांच्यावतीने सत्कार

कणकवली ता.१२-:* कणकवली तालुक्यातील तिवरे गावचे सुपुत्र विकास राजाराम गुरव यांची भारतीय मजदुर संघ सिंधुदुर्ग अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल तिवरे गावातील नोंदीत बांधकाम कामगारांंच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विकास गुरव यांनी बांधकाम कामगाराचे मूलभूत प्रश्न आपण मार्गी लावणार असल्याचे सांगत पुढील काळात शासनाच्या येणाऱ्या योजनांचा फायदा बांधकाम मजुरांना करून देणार असल्याचेही गुरव यांनी सांगितले.

यावेळी भारतीय मजदुर संघाचे पदधिकारी तसेच तिवरे सरपंच भाई आंबेलकर, सत्यवान परब, शाहू गुरव, प्रसाद परब, देवेंद्र तेली, प्रणय गुरव, राजेंद्र म्हाडेश्वर, पांडुरंग म्हाडेश्वर, विनोद सावंत, सदानंद सुतार, केशव म्हसकर, संदीप सुतार, बबन गुरव, दिनेश तेली, विजय परब, रघुनाथ चव्‍हाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप कदम यांनी केले तर आभार सरपंच भाई आंबेलकर यांनी मानले.

You cannot copy content of this page