गरजू गरीब व्यक्तींना जयपूर फूट आणि जयपूर हॅन्डच्या माध्यमातनू संधी

रोटरी क्लबचे अध्यक्ष हनीफ मेमन

देवगड-प्रतिनिधी तालुक्यातील गरजू गरीब व्यक्तींना जयपूर फूट आणि जयपूर हॅन्डच्या माध्यमातनू जी संधी रोटरी क्लब ऑफ मॅन्गोसिटी ला मिळाली आहे हे आमचे भाग्य असून यापुढे असेच सामाजिक उपक्रम राबवून तालुक्यातील गरजू मानस आमचा असल्याचा विश्वास रोटरी क्लबचे अध्यक्ष हनीफ मेमन यांनी उदघाटन प्रसंगी व्यक्त केला. रोटरी क्लब ऑफ मँगो सिटी देवगड यांच्या वर्ष स्पूर्ती निमित्ताने जयपूर फूट आणि जयपूर हॅन्ड मोजमाप शिबिराचे आयोजन जामसंडे येथील सांस्कृतिक भवन सभागृहामध्ये आयोजित करण्यात आले होते. यावेळी संजय धुरी,सुनिल पारकर,विजय बांदिवडेकर,श्रीपाद पारकर,दया पाटील,सनित आचरेकर,प्रविण पोकळे,मनस्वी घारे,रमाकांत आचरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना मेमन म्हणाले की, गेल्या वर्षभरामध्ये रोटरी क्लब देवगडच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आलेले आहेत. गोरगरीब जनता व विदयार्थी यांना केंद्र बिंदु ठेवून त्या दृष्टीकोनातून आम्ही त्यांना मदत व सुविधा देण्याचे काम करीत आहोत. यापुढेही आपले अनेक उपक्रम राबविणार आहोत.

पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातून गोवा राज्याचा विकास होवू शकतो जगाच्या नकाशामध्ये पर्यटनाच्या दृष्टीकोनातून गोवा राज्याचे नाव झळकत आहे. गोव्या राज्यापेक्षा देवगडमध्ये पर्यटन स्थळे असून पर्यटन एके पर्यटनाच्या माध्यमातूनही देवगडचा विकास होणे गरजेचे आहे. या दृष्टीकोनातून पर्यटन व्यवसायांना चालना देण्यासाठी यापुढेही आपले उपक्रम राहणार आहेत असे त्यांनी सांगितले. आज देवगड तालुक्यातील अनेक हात पाय नसलेल्या रुग्णांना कृत्रिम स्वरुपाचे हातपाय मोफत बसविण्याचे काम केले जाणार आहे या शिबिराला अनेक रुग्णांनी सहभाग घेतला होता.

You cannot copy content of this page