कसई दोडामार्गच्या नगराध्यक्षपदासाठी भाजपचेच दोन नगरसेवक आमने सामने

चेतन चव्हाण आणि राजेश प्रसादी आपल्या भूमिकेवर ठाम;वरिष्ठांची डोकेदुखी वाढली

दोडामार्ग ता.१२ सुमित दळवी* कसई दोडामार्गच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक सोमवार १४ फेब्रुवारी रोजी होत असून नगराध्यक्ष च्या निवडणुकीत भाजपचेच दोन नगरसेवक आमने सामने उभे राहिले आहेत. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचा शुक्रवार शेवटचा दिवस होता.

मात्र नगराध्यक्षपदासाठी नामनिर्देशनपत्र दाखल केलेले चेतन चव्हाण आणि राजेश प्रसादी हे दोघेही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत,त्यामुळे हा तिढा सोडविताना वरिष्ठांची डोकेदुखी मात्र अधिकच वाढणार आहे हे मात्र निश्चित आहे. पक्षाने नेमके कुणाला नामनिर्देशनपत्र मागे घेण्याचे आदेश दिले होते हे समजू शकले नाही मात्र वरिष्ठांचे आदेश धुडकावत दोन्ही उमेदवार रिंगणात समोरासमोर राहिले आहेत. कसई दोडामार्ग नगराध्यक्षपदाची निवडणूक निश्चितच लक्षवेधी ठरणार आहे.

You cannot copy content of this page