शाईफेक कृत्याचा कणकवली नगरपंचायत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केला निषेध

काळ्या फिती बांधून कामबंद आंदोलनात सहभाग

कणकवली ता.१०-:* अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ . प्रवीण आष्टीकर यांच्यावर स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकली . या कृत्याचा कणकवली नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती बांधून गुरुवारी कामबंद आंदोलन करत निषेध केला.

या आंदोलनात मुख्याधिकारी अवधूत तावडे किशोर धुमाळे लेखापाल म्हाडेश्वर , सतीश कांबळे , मनोज धुमाळे , रवी म्हाडेश्वर प्रवीण गायकवाड़ , एम आय सावंत , प्रितेश खैरे अमोल भोगले , सचिन नेरकर , विभव करंदीकर , ध्वजा उचले रुचिता ताम्हाणेकर निकिता पाटकर , माधवी डगरे , प्रशांत राणे , संजय राणे , संतोष राणे , सचिन तांबे , संदीप मुसळे रोहन डिचोलकर यांच्यासह न.पं.चे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत . अमरावती महापालिकेचे आयुक्त डॉ.प्रवीण आष्टीकर यांच्यावर जमावाने शाई फेकून त्यांना धक्काबुक्की केली या कृत्याचा कणकवली न.पं.च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून काळ्या फिती बांधून जाहीरपणे निषेध करण्यात असल्याचे मुख्य अवधूत तावडे यांनी सांगितले.

You cannot copy content of this page