भाजप शहराध्यक्ष अजय गोंदावळे यांचा स्तुत्य उपक्रम
सावंतवाडी ता.१०-: भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी नगरपालिकेला ८ बदके भेट स्वरूपात दिली असून, आज त्याच्या हस्ते मोती तलावात ८ ही बदके सोडण्यात आली आहेत.
यावेळी भाजप नगरपालिकेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर, भाजप शहर सरचिटणीस बंटी पुरोहित, नगरपालिकेचे कर्मचारी दीपक म्हापसेकर, पांडुरंग नाटेकर, देविदास आडारकर, अक्षय पंडित, निवेद कांबळी, डूमिंग आल्मेडा आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अजय गोंदावळे बोलताना म्हणाले की, ज्यावेळी नगरपालिकेच्या माध्यमातून यापूर्वी ४ बदके सोडण्यात आली होती. त्यावेळी नागरिकांनी त्या उपक्रमाचे कौतुक करत, चांगला प्रतिसाद दिला होता. त्यामुळे या मोती तलावात आणखी काही बदके सोडण्याचा मानस आपला होता. तो मानस आज माझ्या वाढदिवसानिमित्त पूर्ण करता आल्याने आपल्याला समाधान असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
