शिवजयंती निमित्त पिकुळे येथे तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

दोडामार्ग ता.१०सुमित दळवी* दोडामार्ग तालुक्यातील पिकुळे येथे शिवमहोत्सव मोठया दिमाखात संपन्न होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून वीर मराठा मंडळ पिकुळे (मधलीवाडी) यांनी अनेक कार्यक्रमही आयोजित केले आहेत.

ग्रामीण भागातील मुलांना व्यासपीठ मिळावे, शालेय शिक्षणापासूनच त्यांच्यातल्या वक्तृत्व कला जोपासल्या जाव्यात तसेच ग्रामीण भागातील मुलांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.लहान गटांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपण,माझा राजा शिवबा,मी शिवाजी राजे बोलतोय,जिजाऊंचा शिवबा तर मोठ्या गटासाठी शिवरायांची युद्धनीती, स्वराज्य स्थापना आणि संघर्ष, शिवराय आणि पराक्रमी मावळे, छत्रपती शिवाजी महाराजांची गुणवैशिष्ट्ये असे विषय ठेवण्यात आले आहे.तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच अधिक माहितीसाठी राजन देसाई ९४२०९७५९०१,प्रशांत गवस ९४२००४३२२६,गौरेश गवस ९४०५७२६२०१,राम गवस ९४२००४१६९७ यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन वीर मराठा मंडळ पिकुळे यांनी केले आहे.

You cannot copy content of this page