वेंगुर्ला ता.१०-:* बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या जिमखाना विभागाच्यावतीने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र सरकारच्या खेलो इंडियातर्फे ७५ करोड सूर्यनमस्कार अभियानाचा एक भाग म्हणून सूर्य नमस्कार कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी योग प्रशिक्षक मारिया आल्मेडा आणि रिद्धी साळगांवकर यांनी शास्त्रोक्त पद्धतीने प्रार्थना, मंत्र आणि सूर्यनमस्कार यांची प्रात्यक्षिके घेतली. यामध्ये प्राचार्य डॉ.विलास देऊलकर, प्रा.एस.टी.भेंडवडे, प्रा.डी.आर.आरोलकर यच्यासह सर्व प्राध्यापक, एनसीसी आणि एनएसएस विद्यार्थी सहभागी झाले होते. क्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईक यांच्या हस्ते कु. मारिया आल्मेडा, अपूर्वा परब, निकिता निनावे यांचा क्रिडा क्षेत्रात विशेष प्राविण्य संपादन केल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
