आमदार दीपक केसरकर;बचतगटांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सावंतवाडी : आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगरषरिद व दीनदयाळ अंत्योदय योजना- राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांना सक्षम व शाश्वत रोजगार’ विषयावर महिला बचतगटांसाठी मार्गदर्शनपर चर्चासत्राचे आयोजन केले होते. या चर्चासत्रात शहरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. आमदार केसरकर यांनी महिलांना रोजगारसंबंधी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या संकल्पनेतून साकारत असलेल्या ‘सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या पार्श्वभूमीवर या चर्चासत्राचे आयोजन केले होते. आमदार दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून ‘सेतू महिला शक्तिचा, मार्ग स्वावलंबनाचा’ हे ब्रीद घेऊन ह्या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. आमदार केसरकर यांनी यावेळी महिलांना मार्गदर्शक केल. या चर्चासत्रात शहरातील शेकडो महिलांनी सहभाग घेतला. ४ टप्प्यात शहरातील शेकडो महिलांना स्वावलंबच मार्गदर्शन करण्यात आल. सिंधुरत्न योजनेच्या शासनाच्या विविध विभागामार्फत महिलांच्या सक्षमीकरणसाठी व शाश्वत रोजगार निर्मितीसाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी महिला बचतगटांना मार्गदर्शनपर चर्चासत्र आयोजित करण्यात आल होत.
महिला उद्योग केंद्र वैश्यवाडा, सावंतवाडी इथं हे चर्चासत्र पार पडल. यावेळी आ. दीपक केसरकर यांनी महिलांना सक्षम व स्वावलंबनासाठीच मार्गदर्शन केले. यावेळी ते म्हणाले, शहरात गेली अनेक वर्षे महिलांसाठी विविध उद्योग, प्रकल्प राबविले आहेत. या खात्याचा मंत्री असताना कोट्यवधीचा निधी जिल्ह्यासाठी दिला. मात्र, अधिकाऱ्यांनी त्या योजना सक्षमपणे राबविल्या नाही. आता ही योजना नव्याने सुरू होत असून मी यात पूर्णतः लक्ष घालणार आहे. दोन्ही जिल्ह्यात ही योजना प्रभावीपणे अंमलात आणली जाणार आहे. विविध योजना महिलांसाठी राबवीत असताना, विशेषतः शहरातील बंद प्रकल्प कार्यान्वित करण्यासाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, तुम्हाला लागेल ती मदत शासनाकडून मिळवून देण्याची जबाबदारी आमची असेल असा शब्द आ. दीपक केसरकर यांनी दिला. दरम्यान, मोती तलाव काठावर ‘हॉटेल पॉमपस ते राजवाडा’ दरम्यान महिला सक्षमीकरणासाठी माजी नगराध्यक्ष दत्ताराम वाडकर ‘स्त्री शक्ती उद्यान’ उभारण्या संदर्भात घोषणा आ. केसरकर यांनी केली. ह्या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास ‘खाऊ गल्ली’ सारखा उपक्रम राबविण्यात येणार असून हा प्रोजेक्ट लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे आदेश मुख्याधिकारी यांना दिले. या योजनेच्या माध्यमातून महिलांना उत्पन्न मिळवून देण्याबरोबरच सक्षम व शाश्वत रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं ते म्हणाले.
तर कोणत्याही प्रकारची हयगय याबाबतीत सहन केली जाणार नसल्याचा इशारा आ. दीपक केसरकर यांनी यावेळी दिला.यावेळी भगीरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. प्रसाद देवधर, महाकॉयर समूह समन्वयक शंकर सावंत, कॉनबॅक बांबू फॅक्टरीचे मोहन होडावडेकर, कोकण कृषी विद्यापीठ वेंगुर्लाचे बळवंत सावंत यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याधिकारी जयंत जावडेकर, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, भारती मोरे, दिपाली सावंत, नगरषरिदेचे श्री. भोसले, महिला बचतगटांचे प्रतिनिधी, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. दरम्यान, यानंतर महिलांसाठी सावंतवाडी नगरषरिदेच्या माध्यमातून मोती तलावात बोट सफरच आयोजन करण्यात आले.
