मुक्तांगण महिला मंच अध्यक्षपदी संजना तेंडोलकर

वेंगुर्ला प्रतिनिधी – मुक्तांगण महिला मंचच्या अध्यक्षपदी संजना तेंडोलकर तर कार्याध्यक्षपदी दिव्या आजगांवकर यांची बिनविरोध निवड झाली आहे.

मुक्तांगण महिला मंचची सभा नुकतीच परुळेकर दत्तमंदिर येथे पार पडली. या सभेत सन २०२२-२३ या कालावधीसाठी महिला मंचची नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली. यामध्ये अध्यक्ष-संजना तेंडोलकर, उपाध्यक्ष-निलम रेडकर, कार्याध्यक्ष-दिव्या आजगांवकर, सचिव-स्वाती बांदेकर, खजिनदार-रुपा शिरसाट, उपक्रम विभागप्रमुख- संध्या करंगुटकर, सांस्कृतिक विभागप्रमुख-मयुरी माडकर, सहल विभाग प्रमुख-मंजिरी केळजी, सुजाण पालक केंद्र उपक्रम प्रमुख – साक्षी वेंगुर्लेकर, सदस्य-मीरा सावंत, प्रियांका मठकर, माहेश्वरी गवंडे यांचा समावेश आहे. दरम्यान, २६ जानेवारी रोजी या महिला मंचातर्फे देशभक्तपर गीत गायनाचा कार्यक्रम संपन्न झाला. मुक्तांगणच्या मार्गदर्शक मंगल परुळेकर यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व आणि संविधान जागर याविषयी मार्गदर्शन केले. त्यानंतर झालेल्या चर्चेत मुक्तांगण महिला मंचातर्फे विविध प्रशिक्षणे, कार्याशाळा संस्था भेट, महिला व मुलांसाठी विविध उपक्रम तसेच स्पर्धा राबविण्याचे ठरविण्यात आले.

You cannot copy content of this page