कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांची मागणी
कणकवली ता.२८-: जिल्ह्यातील सर्व शिक्षकांनी कोविड टेस्ट करूनच सोमवारपासुन शाळेत यावे या प्रशासनाच्या निर्णयावर कास्ट्राईब संघटनेने नाराजी व्यक्त केली असुन ज्या शिक्षकांनी दोन डोस घेतले आहेत आणि जे नियमित शाळेत येतात त्यांना कोरोना टेस्ट मधुन वगळावे अशी मागणी कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम यांनी एका पत्रकाद्वारे केली आहे .
सोमवार पासुन शाळा सुरु करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे त्याचे स्वागत कास्ट्राईब शिक्षक संघटना करत आहे मात्र सर्व प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी 24 तासात कोविड टेस्ट करून शाळेत उपस्थित रहावे या प्रशासनाच्या परिपत्रकावर कास्ट्राईब संघटना नाराजी व्यक्त करीत आहे.कारण शाळांमध्ये प्राथमिक माध्यमिक शिक्षक नियमित शाळेत येत आहेत आणि जवळ जवळ बहुतांश शिक्षकांनी दोन डोस घेतलेले आहेत असे कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संदीप कदम म्हणाले.
